"अखंड सेवा, सक्षम नागरिक"

आमची यशोगाथा

  1. गावाविषयीमाहिती

    दसकोड हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील. दसकोड,सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे 1517 आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 5, अंगणवाडी केंद्रे 5 व व्यायामशाळा , सभामंडप- 1 अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावामध्ये तसेच, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

    2.     गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भात, नगली, तूर,उडीद,खुरसणी प्रमुख पिके घेतली जातात. झेंडू हळद या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.

    3.     दसकोड  ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दसकोड गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान मध्ये दसकोड विशेष गौरव पुरस्कार महाराष्ट्र शासन पुरस्कुत तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत सन २०१३-२०१४ पारितोषिक प्राप्त गाव बक्षीस रुपये-लक्ष रुपये  प्राप्त झाला असून स्वच्छता अभियान पुरस्कारही जिल्हा व तालुका  पातळीवर मिळाला आहे.

    4.     ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व 8 सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

    5.     दसकोड गाव आज जव्हार तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

    6.    भौगोलिकस्थान

    दसकोड हे गाव जव्हार तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे 21 कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ 499.93.70 हे आर  असून ग्रामपंचायतीमध्ये 4 वार्ड आहेत. सद्या एकूण 702 कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या 2773 आहे. त्यामध्ये  पुरुष  महिला यांचा समावेश होतो.

    गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन छोट्या प्रमाणात आहे. हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३९°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १५°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी २३०० मीमी पर्जन्य वृष्टी होते.

     3. लोकजीवन

    दसकोड गावाचे लोक जीवन साधे, श्रमप्रधान पारंपरिकआहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून भात, नागली, वरी, तुर, उडीद, खुरसणी, कुळीद हंगामी आंबा, काजु पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेती सह काही लोक दुग्ध व्यवसाय, यामध्ये ही कार्यरत आहेत.

    गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. मखर,माउली,साथी असे आदिवासी सन तसेच हिंदु सन गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्वआहे.

    दसकोड च्या येथील लोक मेहनती, मदतशील  अतिथी देवोभव या विचाराने वावरणारेआहेतस्त्रियांचा सहभाग ग्रामविकास स्वयं साहाय्यगटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुणवर्गशिक्षण, खेळआणिरोजगाराच्यासंधीशोधतप्रगतीच्यादिशेनेवाटचालकरीतआहे.

    दसकोड च्यालोकजीवनातपारंपरिकग्रामीणसंस्कृतीसोबतचआधुनिकतेचीझलकहीदिसते, ज्यामुळेगावाचाविकासआणिएकात्मतादोन्हीजोपासलेजातात.

ग्रामपंचायत दसकोड, जव्हार

प्रगती आणि विकासकामांची संभाव्य माहिती: कोणत्याही ग्रामपंचायतीच्या प्रगतीमध्ये विविध शासकीय योजनांचा (केंद्र आणि राज्य सरकार) समावेश असतो. गावातील विकासकामे सामान्यतः खालील क्षेत्रांवर केंद्रित असतात: पायाभूत सुविधा: रस्ते, पाणीपुरवठा योजना (जल जीवन मिशन), वीजपुरवठा. शिक्षण: जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती/बांधकाम. आरोग्य: प्राथमिक आरोग्य सुविधा किंवा अंगणवाडी केंद्रे. स्वच्छता: स्वच्छता अभियान आणि घनकचरा व्यवस्थापन. रोजगार: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे. घरकुल योजना: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुले.

प्रशासकीय संरचना


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा...

लोकसंख्या आकडेवारी


702
2773
1380
1393

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo